भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश
FB Page- https://www.facebook.com/share/18XqtVdiFS/
भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश
संघटनेची प्रमुख उद्दिष्टे
१. किमान आधारभूत किंमत गँरंटी कायदा देशात लागू करणे.
2. या आधारभूत किमतीच्या खाली खरेदी करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचेवर फौजदारी कारवाईची तरतूद करणे.
3. पिकाऊ शेतजमीन अधिग्रहण रोखणे.
4. शेती क्षेत्रातील पायाभूत सुविधांची जबाबदारी व गुंतवणूक सरकार मार्फत करणे. उदाहरणार्थ रस्ते, वीज, पाणी इ.
5. हायब्रीड संकरीत वाणांवर आणि रासायनिक खतांच्या बेसुमार वापरावर नियंत्रण आणणे.
6. शेतीमाल खरेदीची शासकीय यंत्रणा व गोदाम उभारणीसाठी सरकारकडून वित्तीय तरतुदी करणे.
7. शेतीमाल प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात लघुउद्योग म्हणून विकसित करणे, या उद्योगात शेतकऱ्यांना प्राधान्य देणे.
8. आयात निर्यात धोरणात देशांतर्गत कृषी मालाचे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करणे. अनावश्यक आयात न करणे.
9. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती विनाविलंब जाहीर करणे. नवीन कर्ज सुविधा अल्प व्याजदराने उपलब्ध करून देणे. पिक विमा सुविधा आणि दावा या शेतकऱ्यांना पुरक करणे.
_______________________________________________________________

No comments:
Post a Comment